S2.E3 - व्हायरल नव्हे, व्हायटल - विनायक पाचलग बरोबर
Description
तुम्ही जगाकडे कोणत्या खिडक्यांमधून पाहता?
काही सेकंदाचे, काही मिनिटांचे व्हायरल होणारे व्हिडीयो, शे-दोनशे अक्षरांतल्या प्रतिक्रिया, सतत माहितीचे विस्कळीत किंवा अनावश्यक असे तुकडे घेऊन घेणार्या ब्रेकिंग न्यूज आणि कमी कमी होत चाललेला आपला अटेन्शन स्पॅन... यात क्षणभर थांबून विचार करून, विश्लेषण करून या माहितीच्या तुकड्यांची सांगड घालून आजूबाजूचे जग समजावून घ्यायला जमतय का आपल्याला?
काहीही चटपटीत आणि बथ्थड गोष्टी “व्हायरल” करण्याच्या शर्यतीत भाग न घेता शांत आणि संयत “व्हायटल” (सकस) विश्लेषण करणारे “थिंकबॅंक” हे यूट्यूब वरचे एक दर्जेदार मराठी चॅनल. आजुबाजूस होत असलेल्या राजकिय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यांतरे याकडे सापेक्ष नजरेतून बघत आपल्या जगण्याशी थेट भिडणाऱ्या या डिजीटल चॅनलचा संपादक विनायक पाचलग मेतकूट पाॅडकास्ट वर गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहे.
जाणून घेऊया त्याचा आणि थिंकबॅंकचा आजपर्यंतचा प्रवास.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
या भागामध्ये आलेले संदर्भ,
1. https://www.goodreads.com/book/show/53452906-ten-lessons-for-a-post-pandemic-world
2. https://www.goodreads.com/book/show/54828853-deep-fakes-and-the-infocalypse
3. https://www.goodreads.com/book/show/55987594-jugalbandi
4. https://www.goodreads.com/book/show/60129018-raoparva
5. Amit Verma’s podcast https://seenunseen.in/
6. Advertising is dead: https://shows.ivmpodcasts.com/show/advertising-is-dead-RxHPjV6WU3QJURnD
7. Filter Coffee: https://shows.ivmpodcasts.com/show/the-filter-koffee-podcast-REzRDso5YvWdg9XE
8. https://the-ken.com