# 1843: Cobra effect. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-09-01
Description
ब्रिटिशकालीन भारतात दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक साप मारून बक्षिसे मिळवू लागले . पण लवकरच अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मेलेल्या सापांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी पैसे कमावण्यासाठी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली होती.
इतिहासातील ही प्रसिद्ध घटना "कोब्रा इफेक्ट" म्हणून ओळखली जाते.
Comments
In Channel



