#1627 : आभाळाचं ह्रदय असलेला उद्योजक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2024-11-25
Description
आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इतके की काही त्यांचे नावदेखील नीट सांगू शकत नाहीत. एक-दोन नॉर्मल माणसाप्रमाणे दिसत होते, पण मतिमंद होते. जुळणी करणाऱ्यांत काही मुलीही होत्या.
Comments
In Channel