Discover
Life of Stories

Life of Stories
Author: Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Subscribed: 4Played: 11Subscribe
Share
© 2025 Life of Stories
Description
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
1873 Episodes
Reverse
Send us a text अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० ...
Send us a text एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद...
Send us a text आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इ...
Send us a text लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता. 21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.
Send us a text तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.
Send us a text आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.
Send us a text भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे ...
Send us a text जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हट...
Send us a text त्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.. "पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच? 'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून.. त्यातील काही लोक बोलू लागलं.. 'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘ 'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘ त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आम...
Send us a text डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल’ आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल’ या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!’’ पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन’. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवर...
Send us a text लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉकलेटल) म्हणजे ‘कडू पाणी’! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवी...
Send us a text दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला. सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता. तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले. मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले, "ए चोरा! काय करतोस रे?".......
Send us a text खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ? अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?" यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....
Send us a text परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य ...
Send us a text गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्...
Send us a text जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.
Send us a text एक महिला दुकानात आली आणि म्हणाली, "सेठ, तुमचे दहा रुपये घ्या... !" "तुम्ही "७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी?" त्या महिलेने सहज उत्तर दिले, "हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, "दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण देव कधीही...
Send us a text लग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... "तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?" तो बावचळला ...गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!
Send us a text "तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते. हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं. बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता." शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्याव...
Send us a text टपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं ऐकलं म्हणून न राहवून ते महाद्याला म्हणाले "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय. नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आरं त्येला इंग्रजी येत असून त्येनं काय दिवा लावलाय अख्या गावाला ठाव हाय की. महाद...