# 1871: मज्जापेशीतील मजा मजा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-10-09
Description
डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल’ आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल’ या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!’’ पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन’. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवरसायने आणि त्यांचे परस्पर संबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत.
Comments
In Channel