# 1872: हुप... हुप...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-10-10
Description
त्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती..
"पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच?
'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून..
त्यातील काही लोक बोलू लागलं..
'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘
'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘
त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आमच्याजवळ आले.
'सायेब.. कुणीकडं?
'कोल्हापूरला जातोय..
'मग या माकडीणीला जनावरांचे सिव्हीलला नेऊन पोचवा.. बाकी सारे आमची कोल्हापूरची मानसं करत्यात.
Comments
In Channel