# 1885: भुलभुलैय्या... भुलेचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Description
'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला.



